मुंबईकरांना ताप, आठवडाभरात २६ डेंग्यू तर १६ लेप्टोस्पायरोसीसचे रुग्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 August 2016

मुंबईकरांना ताप, आठवडाभरात २६ डेंग्यू तर १६ लेप्टोस्पायरोसीसचे रुग्ण

मुंबई - मुंबईत तापाचे दोन हजार ७६ रुग्ण आढळले असून मलेरियाचे २९० तर डेंग्यूचे ३२१ संशयित रुग्ण आढळले आहेत. विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, वरळी, मुलुंड, बोरिवली या विभागात डेंग्यूचे संशयित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. आठवडाभरात २६ जणांना डेंग्यू तर १६ जणांना लेप्टोस्पायरोसीस झाल्याचे निदान करण्यात आले आहे. 


मुंबई महापालिकेने पावसाळी आजारांविरोधात हाती घेतलेल्या मोहिमेनुसार ऑगस्टच्या पंधरवड्यात ८ लाख ८७ हजार घरांना भेटी दिल्या. ४४ लाख ३५ हजार लोकांची तपासणी केली असता सुमारे ३४ हजार ४१७ तापाचे रुग्ण आढळले आहेत. बांधकामांच्या ठिकाणी चार हजार ९०९ मजुरांमध्येही तापाची लक्षणे आढळली असून त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तीन हजार ८०१ इमारतींत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ११८७ ठिकाणी एनोफेलीस डासांची उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. त्याचप्रमाणे १३ हजार ५११ ठिकाणी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात २१५५ ठिकाणी एडिस इजिप्ती डासाची उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. जानेवारी ते जुलै या काळात किटकनाशक फवारणी न करणार्‍या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या सात महिन्यांत २५ लाख ३६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. जुलै महिन्यात १९७५ ठिकाणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून तीन लाख चार हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad