मुंबई / प्रतिनिधी 8 Aug 2016 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ३० सनदी अधिकार्यांच्या बदल्या केल्या. यात अमरावती विभागीय आयक्तपदी राज्य निवडणूक आयुक्त जे.पी. गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली असून सिडकोतून व्ही. राधा यांना राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या आयुक्तपदी आणण्यात आले आहे. तसेच प्राजक्ता लवंगारे या सिडकोच्या नव्या एमडी असतील.
मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांना सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी या पदी पाठविण्यात आले आहे. महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव (अपिले) श्याम तागडे यांची अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर व्ही. राधा यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तपदी पाठविण्यात आले आहे. राधिका रस्तोगी यांची उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी तर विकास रस्तोगी यांची महसूल व वन विभागाच्या सचिव (अपिले) आर.डी. देवकर यांची ईएसआयएसच्या आयुक्तपदी पाठविण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सिंघल यांची उद्योग विकास आयुक्तपदी, रायगड जि.प. सीईओ दिलीप पांढरपट्टे यांची धुळे जिल्हाधिकारीपदी, ए.बी. मिसाळ धुळे जिल्हाधिकारी यांची व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे, लातूर जि.प. सीईओ डी.के. जगदाळे यांची आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक, आर. निंबाळकर जि.प. सीईओ भंडारा यांना नागपूर मनपा अतिरिक्त आयुक्तपदी पाठविण्यात आले आहे. के.बी. फंड यांना मुंबई जात पडताळणी समिती अध्यक्ष पदावरून शुल्क नियंत्रण समितीच्या सचिव पदावर पाठविण्यात आले आहे. धुळे विभागीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष माणिक गुरसाळ यांना लातूर जि.प. सीईओपदी पाठविण्यात आले आहे. एमएमआरडीएचे उपायुक्त एस.एल. यादव यांची याच ठिकाणी सहआयुक्त, आर.बी. भागडे नाशिक विभागीय उपयुक्त यांची महाराष्ट्र शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक ए.एन. करंजकर यांची महाराष्ट्र शेतीविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव व्ही. भिमनवार यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अशोक शिंगरे यांची नवी मुंबई विभागीय जातपडताळणी समितीच्या अध्यक्ष पदावरून भिवंडी मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आर.जे. नार्वेकर सहसचिव मुख्यमंत्री कार्यालय यांची रायगड जि.प. सीईओपदी, सिडको अतिरिक्त जिल्हाधिकारी आयुक्त योगेश म्हसे यांची उल्हासनगर मनपा आयुक्त, तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या खासगी सचिव पदावर असलेले नरेश गीते यांची मीरा-भाईंदर मनपाच्या आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांचा कारभार आता आयएएस अधिकार्यांकडे मुख्यमंत्र्यांनी सोपवला आहे.

No comments:
Post a Comment