महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पुल वाहून गेला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 August 2016

महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पुल वाहून गेला

दोन एसटी बसेस आणि काही छोटी वाहनेही वाहून गेली 
मुंबई, दि. ३ - मुसळधार पावसामध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा  सावित्री नदीवरचा जुना पुल  वाहून गेला आहे. या दुर्घटनेत त्यावेळी पूलावर असणा-या दोन एसटी बसेस आणि काही छोटी वाहनेही वाहून गेली आहेत. जयगडहून मुंबईला येणारी एमएच - २० - बीएल 1538 आणि राजापूरहून बोरीवली येणारी एमएच - ४० - एन ९७३९ या दोन बसेस वाहून गेल्या आहेत. या दोन्ही बसमध्ये चालक-वाहकासह मिळून एकूण २२ प्रवासी होते. 
 
जयगड-मुंबई आणि राजापुर-मुंबई या दोन बसेसची नोंद पोलादपुर एसटी स्थानकातून पुढे रवाना अशी आहे; मात्र या दोन्ही बसेस अद्याप महाड बस स्थानकात पोहोचलेल्या नाहीत. पुण्या-मुंबईतून एनडीआरएफच्या दोन टीम्स घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये ४० जवान आहेत. एनडीआरएफ शोधकार्यासाठी सहा बोटींचा वापर करणार आहे. या घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन नौदल आणि वायूदलाची मदत घेण्यात येणार आहे. हॅलिकॉप्टर्सच्या मदतीने शोध कार्य करण्यात येणार आहे. राजापूर-बोरिवली आणि जयगड - मुंबई या एसटी बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी (०२१४१) २२२११८ व टोल फ्री क्रमांक १०७७ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad