मुंबई, 1 ऑगस्ट
राज्यातील सर्व जिल्हयातील सुरक्षा रक्षक मंडळात काम करणाऱ्या कामगारांना दर महिन्याच्या 7 तारखेला वेतन देण्याची जबाबदारी सुरक्षा रक्षक मंडळाची असून प्रत्येक कर्मयाऱ्याला 7 तारखेला वेतन दिले गेले पाहिजे, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले.
कामगार मंत्र्यांच्या विधानभवानातील कक्षात ही बैठक घेण्यात आली. माथाडी बोर्डामार्फत शासकीय कार्यालयांना सुरक्षा रक्षक त्यांच्या मागणीनुसार पुरवण्यात येतात. पण शासकीय विभागाकडून वेळेवर निधी मिळत नसल्यामुळे वेतनाला विलंब होत असल्याचे कारण यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. वास्तविक शासकीय विभागाकडून दिलेल्या सेवेचा निधी वसूल करणे अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याने त्यांनी तो वसूल करावा व कर्मचाऱ्यांना 7 तारखेला द्यावे असे निर्देश यावेळी देण्यात आले.
राज्यात 28 सुरक्षा रक्षक मंडळे असून त्या अंतर्गत 28 लाख लोक काम करतात. माथाडी आणि सुरक्षा रक्षक हे दोन वेगळे विभाग आहे. सर्व सुरक्षा रक्षक मंडळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळास सहभागी करुन घेण्यात यावी. या संदर्भात शासनाने एक कायदा तयार केला आहे. त्या कायद्याची अधिकाऱ्यांची अजून अंमलबजावणी केली नाही. सुरक्षेचे काम माथाडी बोर्डाकडून काढून शासनाच्या सुरक्षा महामंडळाकडे हे काम देण्यात यावे. त्यासाठी कामगार मंत्र्यांनी एक बैठक मुख्यमंत्र्यांसोबत 8 दिवसात घ्यावी अशी सूचनाही ऊर्जामंत्र्यांनी दिली.
या बैठकीत माथाडी बोर्डाचे अधिकारी दिशाभूल करणारी उत्तरे देऊन संभ्रमित करण्याचा प्रयत्न करीत होती. वास्तविक शासनाने एकाच वेळी घेतलेला निर्णय सर्व बोर्डांना लागू व्हायला हवा पण कायद्याचा स्वत:च्या स्वार्थाचा अर्थ काढीत हे अधिकारी बोर्डाचे काम करीत आहे. सुरक्षा रक्षकांना गणवेश पुरवला जात नाही, रात्रपाळी भत्ता इ. दिला जात नाही. अशा अनेक तक्रारी यावेळी कामगारांनी केल्या. या सर्व प्रश्नांवर व माथाडी बोर्ड आणि सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या कार्यप्रणालीवर आठ दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक घेण्याची सूचना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केली.
No comments:
Post a Comment