मुंबई उपनगर जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 August 2016

मुंबई उपनगर जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई 15: स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार हुसेन दलवाई, स्थानिक आमदार तृप्ती सावंत, जर्नादन चांदोलकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, परिवहन आयुक्त प्रविण गेडाम, स्थानिक नगरसेवक, स्वातंत्र्यसैनिक व विद्यार्थी आदी  उपस्थित होते. यावेळी  पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या  विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. महिला व बालविकास विभागाच्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad