मुंबई, दि.13 : सायबर गुन्हेगारीवर वचक बसविण्याबरोबरच अशा गुन्ह्यांची तात्काळ उकलकरुन आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि पोलीसआयुक्तालयांच्या क्षेत्रात ‘सायबर लॅब’ सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 15 ऑगस्ट रोजीस्वातंत्र्यदिनी, एकाच दिवशी राज्यातील 44 ठिकाणी या सायबर लॅबचे उद्घाटन होत असून सायबरगुन्ह्यांच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाचे हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ई-बॅंकिंग, पेपरलेस कार्यालय, सोशल मिडिया आदींचा वापरमोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यातून आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे वापरुन गुन्हे करण्याच्याविविध युक्त्या सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जात आहेत, या गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच हेगुन्हे करणाऱ्यांना वचक बसावा, यादृष्टीने गृह विभागाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याचेनिर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालये आणिपोलीस आयुक्तालय क्षेत्रात ‘सायबर लॅब’ उभारण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. सर्व जिल्हे,पोलीस आयुक्तालयांसह मुंबई, पुणे आणि नागपूर रेल्वे कार्यक्षेत्रात 44 विविध ठिकाणी ‘सायबर लॅब’चीउभारणी करुन गृह विभागाने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. दि.15 ऑगस्ट रोजी,स्वातंत्र्यदिनी एकाच दिवशी या 44 लॅबचे संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्री आणि अन्य मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन होत आहेत.
मुंबईतील सायबर कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सायबर कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी होत आहे. उद्योगमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाईयावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास महापौर स्नेहल आंबेकर, खासदारअरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, विधान परिषद सदस्य राहुल नार्वेकर आदी मान्यवर उपस्थितराहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के.पी.बक्षी, डॉ. विजय सतबीर सिंह, पोलीस महासंचालक सतीश माथूर, विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर)ब्रिजेश सिंह यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment