मुंबई / प्रतिनिधी 9 Aug 2016 - 108 कोटीचा प्रकल्प वाढत वाढत 420 कोटीचा झाला आणि 2 वर्षात सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड या रस्त्यांवर भेगा पडल्या आहेत आणि मध्य रेल्वेस सर्वाधिक धोका असून दुर्घटनेस आमंत्रणाची शक्यता नाकारता येत नाही, अशी तक्रार मुख्यमंत्री सहित एमएमआरडीए,पालिका, एमएसआरडीसी आणि वाहतूक पोलीसांस करत ताबड़तोब उपाययोजना करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे
अनिल गलगली यांच्या मते सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (SCLR) येथील रस्त्यांवर पडलेल्या भेगा आणि खड्डयांची व्यापकता पहाता संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करत रस्ता दुरुस्त करणे आवश्यक आहे. सदर रस्ता बांधून 2 वर्ष झाले नसतानाही असा प्रकार होणे दुर्दैवी आहे. 2 मजली फ्लायओवरच्या पहिल्या मजल्यावर कुर्ला पूर्व दिशेने जाणारा रस्ता खचण्याचा प्रकार धोकादायक आहे कारण या SCLR च्या खालच्या बाजुला रेल्वेची प्रचंड वाहतूक सतत असते आणि लाखों प्रवाशी प्रवास करतात. विशेष म्हणजे ज्या सनदी अधिका-यांनी मुंबई पालिकेत रस्ता कामात घोटाळा केला त्याच अधिका-यांच्या अधिपत्याखाली याही रस्त्याचे काम करण्यात आले आहे.
108 कोटीचे काम 420 कोटीपर्यंत वाढले असतानाही आज या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे, असे सांगत अनिल गलगली म्हणाले की छेडा नगर येथील मार्ग सुद्धा असाच दयनीय आहे. दुसरी बाब ही आहे की कुर्ला पश्चिमेकडील उजवे वळण बंद केल्याचा फटका ही बसला असून उजवे वळण पूर्णरित्या बंद झाल्यामुळे पहिल्या मजल्यावर वाहतूक अधिक वाढली आहे. गेमन इंडिया या कंपनीने काम केले असून सद्या हा रस्ता जरी पालिकेकडे हस्तांतरित केला असला तरी MMRDA आणि MSRDC ची तेवढीच जबाबदारी आहे. अन्यथा कोणत्याही दुर्घटनेस सर्वच शासकीय यंत्रणा जबाबदार राहतील, असे सरतेशेवटी गलगली यांनी नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment