मुंबई, दि. 12 : व्यसनमुक्ती क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना सामाजिक न्याय विभागामार्फत गांधी जयंती सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी मुंबई उपनगरातील इच्छूक संस्था व व्यक्तींनी येत्या 28 ऑगस्ट 2016 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या मुंबई उपनगरच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
व्यसनमुक्ती प्रचार कार्याच्या मोहिमेचा भाग म्हणून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात मौलिक काम करणाऱ्या संस्था व व्यक्तिंना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, शाळा व महाविद्यालये, प्रसिद्धी माध्यमे, उद्योग व कारखाने या गटातून एकूण 51 व्यक्ती व संस्थांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी पासपोर्ट आकाराचे तीन रंगीत छायाचित्रे, केलेल्या कार्याचे वर्तमानपत्रात छापून आलेली कात्रणे, प्रशस्तीपत्रके, पोलीसांचा दाखला यासह मुंबई शहर आणि उपनगरातील व्यक्तिंनी विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर कार्यालय, प्रशासकीय इमारत भाग 1, चौथा मजला, आर.सी. मार्ग,चेंबूर, मुंबई 400071 या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.Post Top Ad
13 August 2016
Home
Unlabelled
महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment