अलिबाग दि. 5 : महाड जवळील सावित्री नदीवर असलेल्या पुल कोसळल्याने वाहून गेलेल्या वाहनातील बेपत्ता व्यक्ती पैकी आज सायंकाळ सहा वाजेपर्यंत एकूण बावीस जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांची ओळख पटलेली असून सदरील मृतदेह शवविच्छेदनानंतर संबंधितांच्या गावी पाठविण्यात येत आहेत.
दिनांक 05/08/2016 सायं.6 वाजे अखेर एकूण 22 मृतदेहांचा शोध घेण्यात आला असून त्यांची ओळख पटलेली आहे. ती नावे पुढील प्रमाणे आहेत.1.) श्रीकांत शामराव कांबळे, 2.) शेवंती मिरगल, 3.) संपदा संतोष वाझे, 4.) आवेद अल्ताफ चौगुले, 5.) पांडूरंग घाग, 6.) प्रशांत प्रकाश माने, 7.) स्नेहा सुनिल बैकर, 8.) प्रभाकर बाबुराव शिर्के, 9.) रमेश गंगाराम कदम, 10.) मंगेश राजाराम काटकर, 11.) सुनिल महादेव बैकर 12.) अनिश संतोष बेलेकर, 13.)अतिफ मेमन चौगुले 14.) बाळकृष्ण बाब्या वरक, 15.) अजय सिताराम गुरव, 16.) विजय विश्राम पंडित, 17.) विनिता विजय पंडित. 18.) संतोष सोनु गवतडे19.) दिपाली कृष्णा बेलेकर, 20.) भिकाजी रामचंद्र वाघदरे, 21.) सुरेश देऊ सावंत, 22) महेंद्र श्रीकांत कांबळे
जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून तेथील टोल फ्री क्रमांक 1077 व दूरध्वनी क्रमांक 02141-222118 असा आहे. या ठिकाणी माहिती तसेच मदत कार्याबाबत समन्वय करण्यात येत आहे. अप्पर जिल्हाधिकारी पी डी मलिकनेर व निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल हे नियंत्रण करीत आहेत. तसेच घटनास्थळी व तहसिलदार कार्यालय, महाड येथे मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांची भोजन व निवास व्यवस्था महाड येथे करण्यात आली आहे. महाडच्या उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे व त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी या नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत.
No comments:
Post a Comment