मोदी सरकारच्या 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या फक्त वर्तमानपत्रातील जाहिरातीवर 35.58 कोटीचा खर्च - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 August 2016

मोदी सरकारच्या 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या फक्त वर्तमानपत्रातील जाहिरातीवर 35.58 कोटीचा खर्च

मुंबई / प्रतिनिधी 
नरेंद्र मोदी सरकारचे 2 वर्ष पूर्ण झाल्याचे आनंद साजरा करण्याकरिता मोदी सरकारने देशातील सर्वच वर्तमानपत्रांमध्ये मोठ मोठ्या जाहिराती दिल्या. देशातील 11236 वर्तमानपत्रातील जाहिरातीवर 35 कोटी 58 लाख 70 हजार 388 रुपये खर्च झाल्याची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे. 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिनांक 26 मे 2016 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध जाहिरातीवर झालेल्या खर्चाची माहिती विचारली होती. डायरेक्टरेट ऑफ एडवरटाइजिंग एंड विसुअल पब्लिसिटीच्या जन माहिती अधिकारी रुपा वेदी यांनी अनिल गलगली यांस मोफत सीडी पाठविली ज्यात 26 मे 2016 रोजी संपूर्ण देशातील 11236 वर्तमानपत्रात प्रकाशित जाहिराती आणि दिलेली रक्कम याची माहिती 179 पानात दिली आहे. या जाहिरातीवर 35 कोटी 58 लाख 70 हजार 388 रुपये खर्च झाला आहे. अनिल गलगली यांनी डॉ मनमोहन सिंग सरकारने 2 वर्ष पूर्ण होताच केलेल्या खर्चाची माहिती विचारली असता डायरेक्टरेट ऑफ एडवरटाइजिंग एंड विसुअल पब्लिसिटीच्या जन माहिती अधिकारी रुपा वेदी यांनी अनिल गलगली यांस कळविले की डॉ मनमोहन सिंग सरकारने 2 वर्ष पूर्ण होताच याप्रकाराची कोणतीही जाहिरातीची मोहीम डीएवीपी यांनी राबविली नाही. 

वर्तमानपत्रातील जाहिरातीचा खर्च कळवित अन्य माध्यमाचा खर्च किती केला गेला आहे याची कोणतीही माहिती आजपर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधिकृतपणे जाहीर केली नाही तसेच अन्य कोटयावधीचा खर्च आजही गुलदस्त्यात आहे. अनिल गलगली यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांस पत्र पाठवून मागणी केली आहे की ज्या प्रमाणे परदेशी दौ-यांची माहिती स्वयंप्रेरणेने संकेतस्थळावर सार्वजनिक केली त्याप्रमाणे सर्व खर्चाची माहिती सार्वजनिक करावी. देशाची आर्थिक स्थिती पहाता काटकसर धोरणास बगल देत वर्षपूर्ति परवडण्याजोगी नाही.तरी अश्या खर्चिक कार्यक्रमास बगल दयावी असे आवाहन अनिल गलगली यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad