मुंबई / प्रतिनिधी 16 August 2016
मुंबई महानगरपालिकेत सफाईचे काम करणार्या हजारो कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्याकड़े पालिका आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी 19 ऑगस्टला दुपारी 2 वाजता मुख्यालयावर मोर्चा आणणार असल्याची माहिती म्युनिसिपल मजदुर युनियनचे उपाध्यक्ष शशांक राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्या सोबत सरचिटणीस एड. महाबळ शेट्टी व रमाकांत बने उपस्थित होते.
महापालिकेत सफाई कर्मचार्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेनुसार कामगारांना मालकी हक्काची घरे मिळालेली नाहित, पालिका वसाहतीच्या जागेवर जास्त सेवानिवासस्थाने बांधता यावीत म्हणून वाढीव क्षेत्रफळ मिळावे, 450 चौरस फूटाचे घर मिळावे, अनुकंपा नोकरी देण्याबाबत 10 जून 2016 ला काढलेल्या परिपत्रकामुले विलंब लागत असल्याने या पत्रकातील जाचक अटी रद्द करून सुधारीत पत्रक काढावे, सफाईसाठी यांत्रिक झाड़ू आणू नए, 24 विभागातील कचरापेट्या हटवू नए, पगाराची पावती उपलब्ध करून द्यावी, सफाई कर्मचाऱ्यांना सफाई कामासाठी लागणाऱ्या वस्तू वेळेवर उपलब्ध करून द्याव्यात इत्यादी मागण्याकड़े महापालिका आयुक्तांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी 19 ऑगस्टला दुपारी 2 वाजता मुख्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे असे राव यांनी सांगितले. आयुक्तांनी या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन जाहिर केले जाईल असा इशारा राव यांनी दिला.
No comments:
Post a Comment