- मुंबईतील 17 हॉटेल, बार व रेस्टॉरंटवरही कारवाई
- राज्यातील 1401 बारची तपासणी
मुंबई, दि 3 - राज्यातील परवाना कक्ष व देशी दारू किरकोळ विक्री करणाऱ्या परवानाधारक हॉटेल, रेस्टॉरंट, बार आदी आस्थापनांमध्ये मद्य विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या पेग मेजर्समध्ये ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या 1041 आस्थापनांवर वैध मापन शास्त्र यंत्रणेने खटले दाखल केले आहेत.
परवानाधारक मद्य व दारू विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये पेग मेजर्सची तपासणी करण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी 28 जुलै ते 30 जुलै 2016 या कालावधीत संपूर्ण राज्यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट व बारची विशेष तपासणी मोहिम राबविली. यामध्ये राज्यातील 1401 हॉटेल/बार व रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली. वैध मापन शास्त्रअधिनियम 2009 व त्याअंतर्गत नियमातील तरतुदीनुसार दारु विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या पेग मेजर्सचे प्रमाण, क्षमता व त्यासाठी वापरावयाच्या धातू यासंबंधीची तरतूद आहे. या नियमातील तरतुदीनुसार वैध मापन यंत्रणेने पेग मेजर वापरणाऱ्या आस्थापनांची तपासणी केली. या तपासणीमध्ये पडताळणी व मुद्रांकन न केलेली पेगमेजर्स वापणाऱ्या 30, पेगमेजर्सची नियतकालीत तपासणी न केलेल्या 623 रेस्टॉरंट, अप्रमाणित पेग मेजर्स वापरणाऱ्या 199, पेगमेजरद्वारे दारु अथवा मद्य कमी देणाऱ्या 5 आणि इतर नियमांचे उल्लघंन करणाऱ्या 181 रेस्टॉरंट/हॉटेलांवर यंत्रणेने कारवाई केली.
या तपासणीमध्ये मुंबईमधील हॉटेल गोकुळ, बे वॉच बार आणि रेस्टॉरंट, प्रीतम बार आणि रेस्टॉरंट, ममगातो गजाव हाऊस शॉप, याच रेस्टॉरंट, काटेल रेस्टॉरंट, फूड सर्च फॅमिली रेस्टॉरंट आणि बार, हॉटेल महेश बार आणि रेस्टॉरंट, नोहाटेल आणि बराज, कुल वॉटर्स, टेंपटेशन बार आणि रेस्टॉरंट, डायमंड रेस्टॉरंट, जॉर्ज इंटरनॅशनल बार आणि रेस्टॉरंट, शेरा रेस्टॉरंट आणि बार, सितारा बार आणि रेस्टॉरंट या 15 बार/हॉटेलांवर कारवाई करण्यात आली.
वैध मापन शास्त्र यंत्रणा ग्राहकांच्या हिताच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण यंत्रणा असून वजन व मापांमध्ये फसवणूक होऊ नये, यासाठी ग्राहकांनी जागरुक रहावे. तेसच यासंदर्भात गैरप्रकार आढळल्यास वैध मापन शास्त्र यंत्रणेस कळवावे, असे आवाहन ग्राहक संरक्षण मंत्री बापट यांनी केले आहे.
ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी मुख्यालयातील नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र. 022-22886666 अथवा ई-मेल पत्ता-dclmms_complaints@yahoo.com किंवा व्हाटस् अप क्रमांक 9869691666 अथवा Facebook वर “Legal Metrology Maharashtra Consumer Grievances” या ठिकाणी संपर्क साधावा. तसेच यासंबंधी विभागीय स्तरावर खालील ठिकाणी संपर्क साधावा.
मुंबई महानगर विभाग-
दूरध्वनी क्र. 022-24148494, ई-मेल- dyclmmumbai@yahoo.in व्हाटस् अप क्रमांक 9004435101.
कोकण विभाग (ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग) -
दुरध्वनी क्र. 022-27574074, ई-मेल- -dyclmkokan@yahoo.in, व्हाटस् अप क्रमांक - 9004435101
पुणे विभाग (पुणे , सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर) -
दुरध्वनी क्र. 020-26697232, ई-मेल - dyclmpune@yahoo.in, व्हाटस् अप क्रमांक - 7588132176
नाशिक विभाग (नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव व नंदुरबार.) -
दुरध्वनी क्र. 0253-2455696; ई-मेल - dyclmnashik@yahoo.in, व्हाटस् अप क्रमांक- 9422252400
औरंगाबाद विभाग (औरंगाबाद, परभणी, नांदेड, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद.) -
दुरध्वनी क्र. 0240-2339656; ई-मेल -dyclmaurangabad@yahoo.in, व्हाटस् अप क्रमांक – 7588554400
अमरावती विभाग (अमरावती, यवतमाळ, अकोला वाशिम व बुलढाणा.) -
दुरध्वनी क्र. 0721-2663291; ई-मेल - dyclmamravati@yahoo.in, व्हाटस् अप क्रमांक- 9422258800
नागपूर विभाग (नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया) -
दुरध्वनी क्र. 0712-2540292; ई-मेल - dyclmnagpur@yahoo.in, व्हाटस् अप क्रमांक - 9404951828.
वरील ठिकाणी यासंबंधी तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन वैध मापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक गुप्ता यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment