चेंबुर येथील पोस्टल काॅलनी मार्ग वर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्डामुळे येथुन ये- जा करणारया नागरिकाना त्रास होत आहे. पालिकेच्या एम / प विभागाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आज दिनांक 5 जुलै 2016 रोजी दुपारी 12.00 वाजता राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पोस्टल काॅलनी मध्ये पडलेल्या खड्डा मध्ये झाडे लावुन अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलन मध्ये चेंबुर तालुका अध्यक्ष जितेंद्र शिंदे, चेंबुर तालुका महिला अध्यक्ष आशाताई मराठे, वार्ड अध्यक्ष दिपक सांवत, शिवाजी गायकवाड, प्रविण बागुल, रोहित पांडव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
Post Top Ad
06 July 2016
PHOTO - चेंबुर मध्ये राष्ट्रवादी काॅग्रेस चे खड्डे बुजवा आंदोलन
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.