रस्त्यावरील दुचाकी वाहनांच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे अपघात
रोखण्यासाठी सरकार विविध नियम करत आहेत पण, अपघात कमी होत नाही.
यावर उपाय म्हणून वाहन चालकाकडे हेल्मेट असेल तरच त्याला पेट्रोल पंपावर पेट्रोल
मिळेल, असा आदेश परिवहन मंत्र्यांनी दिला आहे.
यावर सरकार जोपर्यंत हा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही पेट्रोल विकत घेणार
नाही, असा इशारा महाराष्ट्र पेट्रोल पंप संघटनेचे अध्यक्ष उदय लोढ यांनी दिला आहे.
याबाबत मुंबईतील चेंबूर येथे महाराष्ट्रातील पेट्रोल पंप संघटनेच्या झालेल्या बैठकीत
हा निर्णय घेण्यात आला.
No comments:
Post a Comment