रत्नाकर गायकवाड यांना अटक करा - प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2016

रत्नाकर गायकवाड यांना अटक करा - प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्र्यांनी घेतली प्रकरणाची माहिती ,उचित कारवाईचे आदेश
मुंबई 1 जुलै 2016 -बहुचर्चित दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनचा  वाद अधिकच चिघळत चालला असून या वास्तूच्या  पीपल्स इम्प्रुमेंट ट्रस्ट या संस्थेचे सल्लागार  आणि माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना अटक करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे .दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात वरिष्ठ  पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेवून उचित कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली .


 प्रकाश आंबेडकर यांनी आज मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली , या भेटीदरम्यान आंबेडकर यांनी गायकवाड यांना अटक करण्याची मागणी करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी केली . पीपल्स इम्प्रुमेंट ट्रस्ट ने डॉ. आंबेडकर भवनवर  बेकायदेशीरपणे पाडण्याची  कारवाई केली असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले . जर ही कारवाई कायदेशीर होती तर , रात्रीच्या अंधारात का केली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित  केला  . गायकवाड यांनी अशा प्रकारे कारवाई करून आंबेडकरी अनुयायांचा अपमान केला आहे तसेच  या प्रकरणात रत्नाकर गायकवाड यांची  महत्वपूर्ण भूमिका असून यासाठी त्यांना जबाबदार धरण्यात यावे अशि भूमिका आंबेडकर यांनी मांडली  . 

डॉ. आंबेडकर भवन विकासाच्या नावावर गायकवाड यांच्यासह काही बांधकाम व्यावसायिक ही जागा खाजगी कामासाठी वापरात आणणार असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे . यासंदर्भात ट्रस्ट सांगत असलेली माहिती दिशाभूल करणारी असून याची चौकशी  सरकारने करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे .
दरम्यान आंबेडकर यांची बाजू  ऐकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था ) देवेन भारती यांच्यासोबत दूरध्वनी वरून  चर्चा कऋण या प्रकरणाची माहिती घेतली तसेच उचित कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली . 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad