नवी मुंबईत आंतरजातीय प्रेम प्रकरणातून बौद्ध तरुणाची हत्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2016

नवी मुंबईत आंतरजातीय प्रेम प्रकरणातून बौद्ध तरुणाची हत्या

नवी मुंबई, दि. २० आंतरजातीय प्रेम प्रकरणातून बौद्ध समाजातील अल्पवयीन मुलाची ह्त्या झाल्याची घटना नवी मुंबईतील नेरुळ परीसरात घडली आहे. मुलगा बौद्ध असल्याने मारहाण झाल्याची मृताच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान स्वप्नीलच्या हत्येवरून नेरूळ परिसरात तणाव असून पोलिसांनी अतिरिक्त कर्मचारी मागवून विभागात कडक बंदोबस्त ठेवला आहे. 

स्वप्निल सोनावणे नेरुळच्या एसबीआय कॉलनीत राहात होता व त्याचे दारावे गावातील आगरी समाजाच्या मुलीसोबत प्रेम संबंध होते. त्यांच्या प्रेमाची माहिती मुलीच्या भावाला मिळाली होती. यावरून मुलीच्या भावाने साथीदारांसह स्वप्नीलच्या घरी जाऊन धमकी दिली होती. तसेच घरी येऊन माफी मागण्याची मागणी केली होती. मंगळवारी (१९ जुलै) रात्री स्वप्निल आणि त्याचे आई वडील मुलीच्या घरी माफ़ी मागण्यांसाठी गेले होते. मात्र मुलीच्या घरच्यांनी तू मुलीचा फ़ोटो मोबाईलमधून का डिलीट केला नाहीस, या कारणावरुन जातिवाचक शिव्या देऊन मारहाण केली होती. छातीत मारल्याने मुलगा अत्यवस्थ झाला. त्याला नेरूळ येथील डीवाय पाटील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad