मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर जेवण्यासाठी वेळ आहे, मात्र पीडित मुलीच्या घरी भेट देण्यास वेळ नाही- नितेश राण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 July 2016

मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर जेवण्यासाठी वेळ आहे, मात्र पीडित मुलीच्या घरी भेट देण्यास वेळ नाही- नितेश राण

कोपर्डी प्रकरणी विधानसभेत  स्थगन प्रस्ताव मांडला
मुंबई / प्रतिनिधी
कोपर्डी, कर्जत मधील बलात्कार व हत्येची  घटना अत्यंत निर्घृण व माणुसकीला काळिमा फासणारी आहे,  या  घटनेबाबत विधानसभेत चर्चा करण्यासाठी  आपण  स्थगन प्रस्ताव दिला होता मात्र मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चर्चा करण्याऐवजी  केवळ  निवेदन केले, व चर्चा टाळली. यावरुन सरकार या प्रकरणी किती गंभीर आहे हे स्पष्ट होते. आपण उद्या पुन्हा या प्रकरणी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडू, असे नितेश राणे म्हणाले. 


एवढी गंभीर घटना घडूनही पीडित मुलीच्या घरी भेट देण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर जेवणाला जायचा वेळ आहे मात्र घटनास्थळी जाण्यास वेळ मिळत नाही, अशी टीका त्यांनी केली.  सोशल मीडिया वर टीका सुरु झाल्यानंतर या प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राज्यातील जनतेची माफी मागावी,  अशी मागणी त्यांनी केली.  

मुलीला न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. मुलीला न्याय मिळवून देईपर्यंत या प्रकरणी आवाज उठवू असे ते म्हणाले. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे, मात्र यामध्ये पाच आरोपी आहेत, इतरांना पोलिसांनी त्वरित अटक करावी , अशी मागणी त्यांनी केली.  

गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी पीडितेच्या कुटुंबियांंना त्वरित भेट देण्याऐवजी ते दोन दिवस केरळ मग गोवा असे फिरत राहिले व नंतर सरते शेवटी कोपर्डी ला गेले असे राणे म्हणाले. आमदार नितेश राणे यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाबाबत सर्व पक्षांच्या गटनेत्यांसोबत चर्चा करुन  निर्णय घेण्याचे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad