मुंबई अग्निशमन दलातील रिक्त पदे भरण्याचे निर्देश देणार ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2016

मुंबई अग्निशमन दलातील रिक्त पदे भरण्याचे निर्देश देणार !

विविध गुन्ह्यांकरिता असलेली दंडाची रक्कम वाढवणार!
आमदार पराग अळवणी यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
मुंबई दि. 28 july 2016 : मुंबई अग्निशमन दलातील रिक्त पदे महानगर पालिकेने लवकरात लवकर भरावीत असे निर्देश शासन देईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.तसेच महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये कलम 471 अनव्ये विविध गुन्ह्यांकरिता असलेली दंडाची रक्कम वाढवण्यात येईल असेही आश्वासन त्यांनी दिले.


मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील तसेच विविध ठिकाणी आग लागणाच्या प्रकरणाबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर बोलताना आमदार पराग अळवणी यांच्या प्रशनाला उत्तर देताना मुख्यमंत्री महोदयांनी सदर आश्वासन दिले.

अग्निशमन दलाकडे उपलब्ध असलेल्या व नव्याने घेण्यात येणाऱ्या विविध उपकरणे व साधनांची माहिती लक्षवेधी वरील उत्तरात दिले असले तरी अग्निशमन दलातील रिक्त पदे भरल्याशिवाय दलाला परिणामकारक काम करता येणार नाही.त्यामुळे अग्निशमन दलातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी आमदार पराग अळवणी यांनी केली होती.

तसेच अंधेरी पश्चिम येथील औषध दुकानाची पाहणी केली असता मुंबई महानगरपालिका अधिनियम,1888 च्या कलम 394 अनव्ये दुकानाचा परवाना नसल्याचे आढळल्याने महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला असल्याचे उत्तरात नमूद आहे.मात्र कलम 471 मधील नमूद दंडाची रक्कम अत्यन्त कमी असल्यामुळे त्याची भीती रहात नाही.त्यामुळे मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 मध्ये कलम 471 अनव्ये विविध गुन्ह्यांकरिता असलेली दंडाची रक्कम वाढवण्यात यावी अशी मागणीही आमदार पराग अळवणी यांनी केली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad