रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी दर्जेदार साहित्य वापरावे - उच्च न्यायालय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 July 2016

रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी दर्जेदार साहित्य वापरावे - उच्च न्यायालय

मुंबई - रस्त्यांवरचे खड्डे भरण्यासाठी महापालिका निकृष्ट साहित्य वापरत असल्यानेच पुन्हा पुन्हा खड्डे पडतात, अशी टीका उच्च न्यायालयाने शुक्रवारी केली. त्यामुळे महापालिकेने भले महाग असले, तरी दर्जेदार साहित्य वापरावे, असा सल्लाही खंडपीठाने दिला. 
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या याचिकेची सुनावणी शुक्रवारी न्यायाधीश शंतनू केमकर आणि मकरंद कर्णिक यांच्यासमोर झाली. वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या आणि आमच्यासमोर होणारे युक्तिवाद पाहता महापालिका काहीतरी थातूरमातूर काम करून खड्डे भरते, त्यासाठी निकृष्ट साहित्य वापरले जाते. तात्पुरती मलमपट्टी म्हणूनच हे काम केले जाते. म्हणूनच पुन्हा पुन्हा खड्डे पडतात, अशी टीका खंडपीठाने केली. 

रस्तेदुरुस्तीसाठी निकृष्ट साहित्य वापरले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करणे रास्त आहे. शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते अत्यंत खराब आहेत. त्यामुळे आता महापालिकेच्या तज्ज्ञ समितीने, यात लक्ष घालून खड्ड्यांची दुरुस्ती का होत नाही, हे तपासावे, असे न्यायालयाने सुचवले. व्यापक जनहित लक्षात घेऊन महापालिकेने खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी टिकाऊ साहित्य वापरावे, ते महाग असेल तरीही चालेल. इंडियन रोड कॉंग्रेसने सुचविलेली रस्तादुरुस्ती आणि बांधणीची तंत्रे वापरण्यावरही तज्ज्ञ समितीने विचार करावा. रात्री वाहतूक बंद झाली, की रस्तेदुरुस्ती करावी, मात्र त्या वेळी ध्वनिप्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही खंडपीठाने सुचवले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad