कोट्यावधी रुपयांचे ब्रिटानिया पप्मिंग स्टेशन ही कामी आले नाही
हिंदमाता, धोबी तलाव, गांधी मार्केट, परेल, सायन, घाटकोपर मध्ये पाणीच पाणी
मुंबई / प्रतिनिधी 2 July 2016
मुळसधार पावसामुळे आज मुंबईत जागो जागी पाणी तुंबले होते. विशेष म्हणजे, मुसळधार पाऊस आणि त्यात समुद्राला आलेली मोठी भर्ती या समोर 108 रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनचा काहीच फायदा झालेला नाही.
शुक्रवार सायंकाल पासून पावसाने जोर धरलेला होता. हा पाऊस शनिवारी दुपार पर्यन्त मूसळधार पडत होता. त्यात समुद्राला सकाळी 11 वाजल्यापासून भरतीला सुरुवात झाली. ही भरती दुपारी 2 वाजता ओसरणार होती. पण समुद्राची भरती सांयकाली 4 वाजून 19 मिनिटांनी ओसरली.
या दरम्यान मुंबईत साचलेले पाणी समुद्रात सोडताना अडचण निर्माण झाली. यामुळे कित्येक ठिकाणी 4 ते 5 तास पावसाचे पाणी तुंबले होते. यामध्ये खास करून हिंदमाता, परेल टी. टी., धोबी तलाव, गांधी मार्केट, परेल, सायन आणि घाटकोपर आदि विभागांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यातूनच वाट काढत जावे लागले. त्यात येथील वाहतुक ही वळविन्यात आली होती.
तर सायन येथील मुख्याधापक नाला आणि रोड नंबर 24 येथे अडीच ते तीन फुट इतके पानी साचले होते. मात्र या ठिकाणातील पावसाचे तुबंलेले पाणी समुद्राची भरती सायंकाळी ओसरली तरी कमी झाले नव्हते, अशी कबूली माहापालिकेने दिली.
या मुसळधार पावसात शुक्रवारी सांयकाळ ते शनिवार सांयकाळ पर्यन्त 95 झाडे पडली. त्यात 9 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या तर 6 ठिकाणी घरे आणि भिंती पडल्याच्या आणि एका ठिकाणी दरड कोसळयाची घटना घडली. या सर्व घटनामध्ये सुदैवाने कोणी जखमी वा मृत झाल्याचे वृत्त नाही. तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा काही कालावधीसाठी बंद होती. मध्य रेल्वेवरील सायन आणि माटुंगा स्थानका दरम्यान रेल्वे रुलावर पानी साचल्याने लोकल उशिराने धावत होत्या.
तलावांमध्ये चांगला पाऊस
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये चांगला पाऊस पडत असल्याने तलावातील पाण्याची पातळी वाढलेली आहे. शुक्रवारी तालावांमधील पाण्याची पातळी 1 लाख 10 हजार मिली लीटर होती. मात्र आता पडत असलेल्या मिसळधार पावसामुळे तालावांची पाण्याची पातळी 9 हजार मिली लीटरने अधिक वाढली.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये चांगला पाऊस पडत असल्याने तलावातील पाण्याची पातळी वाढलेली आहे. शुक्रवारी तालावांमधील पाण्याची पातळी 1 लाख 10 हजार मिली लीटर होती. मात्र आता पडत असलेल्या मिसळधार पावसामुळे तालावांची पाण्याची पातळी 9 हजार मिली लीटरने अधिक वाढली.
भरती मुळे साचलेले पाणी समुद्रात सोडताना अडचण
समुद्राच्या मोठ्या भरती मुळे साचलेले पावसाचे पाणी समुद्रात सोडताना मोठी अडचण निर्माण झाली. त्यामुळे ब्रिटानिया पप्मिंग स्टेशनचे दरवाजे 2 वाजता उघडणे अपेक्षित होते ते सांयकाली 4 वाजता उघडावे लागले. यामुळे हिंदमाता परिसरातील पावसाचे तुम्बलेले पानी सांयकाली 4 पर्यन्त होते. तूबलेल्या पाण्यामुळे हिंदमाता येथील वाहतूक 4.25 पर्यन्त दुसऱ्या मार्गावर वळविन्यात आली होती. विशेष म्हणजे, पालिकेने ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनसाठी 108 रूपये खर्च केले आहेत. हे पम्पिंग स्टेशन यंदा पावसाळयात सुरु करण्यात आले आहे. मोठा गाजावाजा करत या पम्पिंग स्टेशन मुळे पावसाचे पाणी हिंदमाता आणि त्याच्या आसपासच्या परिसरात साचनार नाही, असे म्हटले गेले होते. पण आजच्या समुद्र भरतीमुळे पावसाचे तुम्बलेले पाणी पम्पिंग स्टेशनने समुद्रात सोडण्यासाठी भरती ओसरल्यावरच दुपारी 4 नंतरच पम्पिंग स्टेशनचे दरवाजे उघडावे लागलेले आहे.
No comments:
Post a Comment