मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम मोर्चामध्ये सहभागी होणार
मुंबई / प्रतिनिधी
दादर येथील बुद्धभूषण प्रेस आणि आंबेडकर भवन पाडल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड संताप पसरलेला आहे. आंबेडकर भवन पाडणाऱ्यांच्या विरोधात मंगळवार दि. १९ जुलै २०१६ रोजी दुपारी ११.०० वाजता भीमसैनिकांचा प्रचंड मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी या महामोर्चाची हाक दिलेली आहे.
हा मोर्चा भायखळा येथील जिजामाता उद्यान ते विधानभवन असा निघणार आहे. हा मोर्चा सर्व पक्षीय असून काँग्रेसचा ही ह्यामोर्चाला संपूर्ण पाठिंबा आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, मी स्वतः उद्याच्या मोर्चात सहभागी होणार असून मी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की, त्यांनी या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे.
No comments:
Post a Comment