चायना मेड मशीनना पालिकेत विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2016

चायना मेड मशीनना पालिकेत विरोध

मुंबई / प्रतिनिधी 5 July 2016 
चीन हा भारतचा शत्रू आहे. चिनी कंपनीची परिक्षण सेवा योग्य नसल्याचा पूर्वानुभव आहे, असा आक्षेप घेत स्थायी समितिने पालिका रुग्णालयात चायनीज कंपनीकडून ईसीजी, ब्लड प्रेशर, ऑक्सीजन सच्युरेशन, ईटीसीओटू, रेस्पिरेशन, तापमान हे परिणाम निरिक्षण करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या मल्टीपरामीटर पेशंट मॉनीटर यंत्राचे 275 नग खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव आज फेटाळून आपल्या राष्ट्राप्रती बाणेदारपणा दाखवून दिला. एवढेच नव्हे तर मुंबई महापालिकेने राष्ट्रभावना तेवत ठेवण्यासाठी चायनिज कंपनी ऐवजी भारतीय कंपनीला पसंती देऊन भारतीय कंपनीलाच सदर यंत्र पुरवठा करण्याचे कंत्राटकाम द्यावे, अशी मागणीही भाजपचे गटनेते मनोज कोटक, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad