खराब अॅनेस्थेशिया मशीन पुरवठा करणाऱ्या कंपनीविरोधात कारवाई करा
आमदार नितेश राणे यांची विधानसभेत मागणी
मुंबई 29 July 2016 - युनिव्हर्सल ऑरगॅनिक्स या कंपनीने चीनमधून आयात करुन मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांना पुरवलेल्या अॅनेस्थेशिया मशीनचा दर्जा अत्यंत खराब असल्याने या कंपनीविरोधात काय कारवाई केली व महापालिका आयुक्तांनी या कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिल्यानंतरही त्या कंपनीविरोधात कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून उपस्थित केला.
या कंपनीविरोधात काय कारवाई करणार व या कंपनीविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांविरोधात कोणती कारवाई करण्य़ात येईल, याची माहिती नगरविकास व गृह राज्यमंत्री ड़ॉ रणजित पाटील यांनी द्यावी अशी मागणी राणे यांनी केली. त्यावर बोलताना आजचे कामकाज संपण्यापूर्वी या विषयावर निवेदन करण्याचे आश्वासन रणजित पाटील यांनी दिले.
मुंबई महापालिकेने अॅनेस्थेशिया मशीन पुरवण्याचे कंत्राट युनिव्हर्सल ऑरगॅनिक्स या कंपनीला दिले होते. या कंपनीने लंडनमधून वीस मशीन्स आणल्या व चीनमधून एकतीस मशीन्स आणल्या. चीनमधून आणलेल्या सर्व एकतीस मशीन्स खराब असल्याने त्या मशीन्स वापराविना पडून आहेत. त्यामुळे रुग्णांना त्रास होत असून मोठ्या प्रमाणात निधीचा अपव्यय झाला आहे. यामध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.
अॅनेस्थेशिया मशीनच्या दर्जाबाबत तक्रारी आल्यानंतर या कंपनीने पुरवलेल्या मशीन्स बाबत महापालिका आयुक्तांनी दोन सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने युनिव्हर्सल ऑरगॅनिक्स कंपनीने पुरवलेल्या अॅनेस्थेशिया मशीन्स खराब असल्याचा अहवाल दिला. या कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले आहेत व कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र महापालिका प्रशासनाकडून आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवण्यात आले व या कंपनीविरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या कंपनीविरोधात त्वरित गुन्हा नोंदवावा व कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.

No comments:
Post a Comment