मुंबई १२ जुलै / प्रतिनिधी
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांची जबाबदारी घेण्याचे टाळत असून मुंबईकर जनता मूर्ख आहे असे समजून त्यांचा हा खेळ सुरू आहे. ही बाब अतिशय गंभीर असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खड्यांच्या प्रश्नवर तीव्र आंदोलन उभारणार असल्याचं इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घटनेते धनंजय पिसाळ यांनी केला आहे.
दरवर्षी पावसात रस्त्यावर खड्डे पडतात , त्यामुळे पादचारी व वाहनचालकांना अतोनात त्रास व उपद्रव सहन करावा लागतो ही वस्तुस्तिथी आहे. आज भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी पालिकेच्या रस्त्यावरील खड्डे प्रकरणी शिवसेनेला जबाबदार धरले . तर शिवसेनेने सरकारी अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यावरील खड्डे प्रकरणी भा ज पा वर आरोप केले . अशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेने राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या जबाबदारीचे भान न ठेवता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजविणे हे या दोन्ही सत्ताधारी पक्षाची जबाबदारी असताना सत्तेची मधुर फळे चाखत मुंबईकरांच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत असा आरोप धनंजय पिसाळ यांनी केला आहे. करदात्या मुंबईकरांना अशा प्रकारे मूर्ख बनविण्याचा जो प्रकार सुरू आहे तो जास्त दिवस टिकणार नाही , येत्या पालिका निवडणुकीत मुंबईकर जनता शिवसेना भाजपाला त्यांची जागा दाखऊन देईल असे पिसाळ यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment