मुंबईकरांना गॅस्ट्रोची लागण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 July 2016

मुंबईकरांना गॅस्ट्रोची लागण

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईत हळूहळू साथीच्या आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण अद्याप वाढलेले नसले तरी दूषित पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रोची साथ मुंबईत पसरली आहे. १० जुलै रोजी एका दिवसात गॅस्ट्रोची लागण झालेल्या ८४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलेरिया आणि डेंग्यूचे १६ रुग्ण आढळून आले आहेत. तर, टायफॉईडचे ९ आणि हॅपिटायटिसचे (ए,ई) १२ रुग्ण आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad