मुंबई / प्रतिनिधी – बेस्ट कर्मचार्री क्रेडिट सोसायटीच् या निवडणुकीत जयश्री खाडिलकर यांच्या रयत राज प्यानलने ५ हजार मते खाल्याने कामगार नेते शरद राव यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला असताना याच प्यानल मधून निवडणूक लढवणारे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे सदस्य असलेले ३ उमेदवार निवडून आले आहेत. रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली चालवले जाते.
८०० कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या बेस्ट क्रेडिट सोसायटीमध्ये ३२ हजार सभासद आहेत. यापैकी २४ हजार कर्मचाऱ्यांनी मतदान केले. यावेळी ५ हजार मते बाद झाली. निवडणुकीत शरद राव, शिवसेना आणि जयश्री खाडिलकर यांचे असे ३ प्यानल होते. शिवसेनाप्रणीत उत्कर्ष पॅनेलच्या समोर तीन पॅनलचे आव्हान होते. शरद राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनचे पॅनेल, जयश्री खाडिलकर यांचे रयतराज पॅनेल आणि भाजप व काही कामगार संघटनांचे परिवर्तन पॅनेल या सगळ्या पॅनेलना धूळ चारत शिवसेनेचे पॅनल निवडून आले आहे. उत्कर्ष पॅनलला ९५०० मते मिळाली. शिवसेना प्रणित उत्कर्ष प्यानलने २१ पैकी १६ जागा जिंकल्या आहेत. इतर जागांमध्ये अनुसूचित जातीमधून राव प्यानल मधून निवडणूक लढवणारे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे संजय घाडीगावकर, अजित बने, संध्या चव्हाण हे तीन उमेदवार निवडून आले आहेत. रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन ३ उमेदवार जिंकल्याने फेडरेशनचे कोषाध्यक्ष सिद्धार्थ रणपिसे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment