मुंबई - मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या छायाचित्रांचा अल्बम घेऊन महापौरांकडे तक्रार देण्यासाठी गेलेल्या भाजप खासदार किरीट सोमय्यांची शिवसेनेने मंगळवारी चांगलीच गोची केली. सोमय्यांचा तक्रार अर्ज स्वीकारतानाच मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या छायाचित्रांचा अल्बमचे साेमय्यांना 'गिफ्ट' दिले. आणि मुंबईचे खासदार म्हणून या खड्ड्यांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंतीही करत सोमय्यांची चांगलीच अडचण केली.
मुंबईच्या खड्ड्यांना सत्ताधारी म्हणून फक्त शिवसेनाच जबाबदार असल्याचे भासवण्याचा साेमय्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास माध्यम प्रतिनिधींना आगाऊ सूचना देत सोमय्या महापालिका मुख्यालयात दाखल झाले. निवेदनासोबत महापालिकेच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा फोटो अल्बमही महापाैरांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले हाेते. महापाैरांच्या दालनात या दोहांेमध्ये बैठक सुरू असताना शिवसेनेच्या एकेका नगरसेवकाने महापौरांच्या दालनात प्रवेश करण्यास सुरूवात केली. काही भाजपचे नगरसेवकही दालनात आले.

यावेळी महापौरांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएमआरडीए या राज्य सरकारच्या अखत्यारित विभागांच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा अल्बम सोमय्यांकडे सुपूर्द केला. महापालिका रस्त्यांवरील खड्ड्यांची आम्ही काळजी घेऊच, मात्र राज्य सरकारच्या विभागांकडे असलेल्या खड्ड्यांबाबत आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी गळही महापौरांनी सोमय्यांना घातली. एकूणच महापौर आणि शिवसेना नगरसेवकांचा नूर पाहता सोमय्यांनी मग सबुरीची भूमिका घेतली. इतकेच नव्हे तर महापौरांच्या बैठकीआधी असलेला त्यांचा तक्रारीचा सूर निवळला व त्यांनी चक् महापौरांसोबत एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी खड्डे बुजवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची ग्वाहीसुद्धा दिली. त्यामुळे पाऊण तासांच्या या बैठकीत सोमय्यांचे झालेले मतपरिवर्तन हाच महापालिकेत चर्चेचा विषय ठरला.
No comments:
Post a Comment