मुंबईकरांवरची २० टक्के पाणीकपात रद्द - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 July 2016

मुंबईकरांवरची २० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई / प्रतिनिधी दि. २० - मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये दमदार पाऊस पडल्यामुळे महानगरपालिकेेने मुंबईकरांवरची २० टक्के पाणीकपात अखेर रद्द केली. स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत पालिका प्रशासाने याबाबतचा निर्णय जाहीर केला.

गेल्या वर्षी कमी पावसामुळे व कमी पाणीसाठ्यामुळे मुंबईकरांना २७ ऑगस्ट २०१५ ते आजपर्यंत २० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागत होता. तसेच उद्योग आणि हॉटेलांसाठी ५० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. पाणीकपातीमुळे अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. परिणामी अनेक भागांत पाण्याची चणचण भासत होती. तलाव क्षेत्रात यंदा चांगला पाऊस पडल्याने व पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने प्रशासनाने पाणीकपात रद्द करावी, अशी मागणी मागील स्थायी समिती बैठकीत भाजपाचे दिलीप पटेल यांनी केली होती. इतर सदस्यांनीही तलाव अर्धे भरल्याने पाणी कपात रद्द करावी या मागणीला पाठिंबा दिला होता. यानंतर सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी पालिका आयुक्तांकडे पाणी कपात रद्द करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. यामुळे बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत पालिका अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी पाणीकपात रद्द केल्याचे जाहीर केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad