या स्पर्धेतंर्गत छायाचित्रकारांनी ‘जलयुक्त शिवार’ व ‘आदिवासी विकास’ या दोन विषयांशी संबंधित छायाचित्रे काढून ती exhibition.dgipr@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावर फोटो ओळींसह (कॅप्शन) पाठवावीत. छायाचित्रांचा तांत्रिक दर्जा उत्कृष्ट असण्यासाठी ती हाय डेफिनेशन (HD Formate) प्रकारात कमीत कमी १२८० X ७२० px resolution मध्ये असावीत. दोन्ही प्रकारात निवड झालेल्या पहिल्या 3 छायाचित्रांना अनुक्रमे 5 हजार, 3 हजार व 2 हजार असे पुरस्कार दिले जातील.
या व अन्य छायाचित्रांचा उपयोग माहिती संचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या लोकराज्य मासिक, वृत्तपत्र, जाहिरात, सोशल मिडिया, प्रदर्शने अशा विविध प्रसिद्धी माध्यमांसाठी करण्यात येईल. छायाचित्र पाठवावयाची अंतिम तारीख 15 जुलै, 2016 अशी आहे.
No comments:
Post a Comment