मुंबई, १९ जुलै : दादर (मुंबई) येथील आंबेडकर भवनाची तोडफोड करणा-यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. सदर जामीन रद्द व्हावा, यासाठी राज्य सरकार आव्हान देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
आंबेडकर भवनाची रात्रीच्या वेळी भाडोत्री मजूर व गुंडांची फौज घेऊन पाडण्यात आले. त्या विरोधात राज्यभरात तीव्र भावना आहेत. अशा प्रकारे तोडफोड करणा-यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आमदार बळीराम शिरस्कार यांनी सभागृहात अध्यक्षांसमोरील हौदात येऊन घटनेचा निषेध व्यक्त केला. त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जागेवर जाऊन विषय मांडण्याची अनुमती दिली. त्यावर शिरस्कार यांनी घटनेचा निषेध व्यक्त करत समाजात असंतोष पसरला आहे. सरकार अशा समाजकंटकांना पाठीशी घालत असून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही शिरस्कार यांनी केली.
No comments:
Post a Comment