महापौरांच्या हस्ते बोधचिन्ह असलेले नगरसेवक बिल्ले (बॅजेस) वितरीत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 July 2016

महापौरांच्या हस्ते बोधचिन्ह असलेले नगरसेवक बिल्ले (बॅजेस) वितरीत

मुंबई दिनांक २९ जुलै २०१६ - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची ठळकपणे स्वतंत्र ओळख होऊन त्यांचा महापालिका व इतर ठिकाणी सन्मान राखला जावा यासाठी पालिका बोधचिन्ह असलेले बिल्ले बृहन्मुंबई महानगरपालिकेने तयार केले असून नगरसेवकांना देण्यात येणाऱया बिल्ल्यांचे (बॅजेस) महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते तसेच उप महापौर अलका केरकर व महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरुपात सर्व पक्षीय गटनेते यांना आज (शुक्रवार,दिनांक २९ जुलै २०१६) वितरीत करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवक/ नगरसेविकांना सदर बॅजेस वितरीत करण्यात येणार आहेत.


महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद सदस्यांची ठळकपणे ओळख व्हावी तसेच त्यांना विधानसभा/विधानपरिषद सभागृहात प्रवेश मिळण्याकरिता तसेच त्यांचा सन्मान राखला जावा म्हणून राज्यशासनाने  त्यांना बिल्ले (बॅजेस) दिले असून  त्याचधर्तीवर बृहन्मुंबई महापालिकेने हे बिल्ले तयार केले आहेत. महानगरपालिका सदस्यांना महानगरपालिकेचे बोधचिन्ह किंवा प्रतिकृती असलेला  बिल्ला देण्याबाबत समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी गटनेत्यांचा बैठकीत प्रस्ताव सादर केला  होता. या प्रस्तावाला सर्व गटनेत्यांनी एकमुखी मंजूरी दिल्यानंतर जनसंपर्क विभागाने याबाबतची संपूर्ण कार्यवाही केली आहे.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad