मुंबई: 7 जुलै - मुंबईतील डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची शास्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी आता कचऱ्याच्या दुर्गंधीवर उतारा म्हणून मुंबई महापालिका सुगंधी द्रव्याची फवारणी करणार आहे. मुंबई महापालिकेचा हा निर्णय म्हणजे "रोग मांडीला आणि इलाज शेंडीला' अशा पद्धतीचा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. विशेष म्हणजे या सुगंधी द्रव्यासाठी तब्बल १ कोटी १५ लाखांच्या सुगंधी द्रव्याची खरेदी करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेने मंजुरीही दिली आहे.
उन्हाळ्यात या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आगी लागल्याने निघणाऱ्या धुरामुळे त्रस्त असलेले नागरिक आता पावसाळ्यात कचऱ्यापासून निघणाऱ्या दुर्गंधीने त्रस्त आहेत.पावसाच्या पाण्याने कचरा कुजत असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी तर सहन करावी लागत आहेच, शिवाय त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अशा वेळी ही समस्या समुळ नष्ट करण्याऐवजी असल्या थातूरमातूर उपायांनी काय होणार,असा संतप्त सवाल करत महापालिकेच्या निर्णयावर मा. अहिर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. देवनार डंपिंग ग्राऊंडवर वारंवार लागत असलेल्या आगीनंतर आपण स्वत: त्या ठिकाणची पाहणी केली होती. तसेच महापालिकेच्या डंपिंग धोरणाचा निषेध म्हणून स्थानिक रहिवाशांच्या साथीने रास्ता रोकोही केला होता, असे सांगत अहिर म्हणाले की, मुंबईतील कचऱ्याची समस्या शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यामुळेच सुटेल. त्यासाठी या विषयात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन एक कालबद्ध आराखडा आखण्याची गरज आहे. मुंबईत कचऱ्याच्या समस्येने इतके गंभीर स्वरूप धारण केलेले असताना शेजारी असलेल्या नवी मुंबईसारख्या शहरात मात्र कचऱ्याची कोणतीही समस्या नसल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.कोणताही दुरगामी उपाय न करता महापालिका जर कचऱ्यावर सुगंधी द्रव्याची फवारणी करण्यासारखा फुटकळ इलाज करत असेल, तर महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनाची किव करावी लागेल, असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. मुळ समस्येला बगल देऊन मुंबईकरांचे लक्ष भलत्याच गोष्टीकडे वळवण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

No comments:
Post a Comment