मुंबई (प्रतिनिधी)- वांद्रे टर्मिनस येथे चुकीच्या मालाची नोंद करून जकात चुकवून मुंबईत आणण्यात आलेली ९५० किलो चांदी जकात खात्याच्या दक्षता पथकाला पकडण्यात यश आले. या चांदीची एकूण किंमत ४७ कोटी पाच लाख असून त्यावर शुक्रवारी सुमारे १० कोटी ४५ लाख रुपये दंडासहीत वसूल करण्यात आले. पालिका इतिहासातील प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात चांदी पकडण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उपायुक्त बापूसाहेब पवार आणि कर निर्धारण व संकलन विभागाचे संजोग कबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जकात दक्षता पथकाचे अभय चौबळ यांच्या अधिपत्याखाली मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून जकात चूकवून आणलेली चांदी वांद्रे टर्मिनस येथे २५ मे रोजी पडकण्यात आली होती. वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे पकडण्यात आलेल्या या चांदी ९५० किलो असून याची किमंत ४५ कोटी ५ लाख असल्याचे समजते. यावर दंडासहीत १० कोटी ४५ लाख रुपये महसूल पालिका तिजोरीत जमा झाला.
सदर कारवाईच्या सुमारास संजय वाडकर, सुधीर चव्हाण, किशोर कापडेकर आणि जाधव यांनी उत्तम कामगिरी बजावत हा सापळा यशस्वी केला. पाच वर्षापूर्वी ७०० किलो चांदी पकडण्यात आली होती. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पालिकेच्या दक्षता पथकाने चांदी पकडून इतिहास रचला आहे.
No comments:
Post a Comment