इंदु मिलमधील डॉ आंबेडकर स्मारकासंबंधी प्रधानमंत्री मोदींची आठवलेंनी घेतली भेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 July 2016

इंदु मिलमधील डॉ आंबेडकर स्मारकासंबंधी प्रधानमंत्री मोदींची आठवलेंनी घेतली भेट

नवी दिल्ली दि 29 July 2016 - इंदुमिलमधील उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे  काम त्वरित मार्गी लागण्यासाठी इंदुमिल मधील सर्व जमीन राज्य शासनाकडे त्वरित हस्तांतरित करावी तथा इंदुमिलमधील डॉ आंबेडकर स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे या सह विविध विषयांवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली 
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन मधील घराचे लोकार्पण झाल्यानंतर त्या स्मारकाची काळजी घेणारे व तेथे भेट देणाऱ्यांसाठी ते स्मारक नेहमी खुले राहावे यासाठी तेथे केअरटेकर नियुक्त करण्यात यावे अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना यावेळी झालेल्या चर्चेत केली 
  
प्रधानमंत्री मोदी पुण्यात येत्या ऑक्टोंबरमध्ये येणार                                      
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष असल्याने रिपाइंतर्फे येत्या ऑक्टोंबर मध्ये महामानव डॉ आंबेडकरांच्या गौरवार्थ अभिवादनासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे पुणे येथे येत्या ऑक्टोंबरमध्ये रिपाइंच्या वतीने होणाऱ्या जाहीर सभेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वेळ द्यावा असे रिपाइंतर्फे  पत्र दिल्यानंतर या सभेस त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार नक्की वेळ देणार असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना आज दिले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad