पालिकेच्या जल अभियंताच्या बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या सचिवाचा कब्जा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2016

पालिकेच्या जल अभियंताच्या बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या सचिवाचा कब्जा

मुंबई / प्रतिनिधी 1 जुलै 2016
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवालयातील सचिव असलेले प्रवीण दराडे यांनी मलबार हिल येथील जल अभियंताच्या बंगल्यावर अनोखा कब्जा केला असून राज्य शासनातील सचिवास अश्या प्रकारे बंगला देण्याचा प्रथमच प्रयोग आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीवरुन हा प्रकार उघडकीस आला आहे. आयएएस पतीला वाचविण्यासाठी आयआरएस पत्नीने माहिती देण्यास रोखले आहे.


माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी जल अभियंता कार्यालयाकडे डॉ संजय मुखर्जी आणि पल्लवी दराडे हे ज्या जल अभियंताच्या मलबार हिल येथील बंगल्यात राहत आहे त्यावर झालेल्या विविध खर्चाची माहिती मागितली होती. जल अभियंता कार्यालयाने दिलेल्या माहितीत डॉ संजय मुखर्जी यांच्या बंगल्यावर 1 कोटीहून अधिक रक्कम खर्च झाल्याची बाब समोर आली आहे तर पल्लवी दराडे यांनी आपल्या पतीचे बिंग फुटेल या भीतीने दिनांक 10 जून 2016 रोजीच्या पत्राने अनिल गलगली यांस त्यांच्या बंगल्यावर झालेल्या खर्चाची कोणतीही माहिती देण्यास आक्षेप घेतला आहे.

खर्चा सोबत प्रवीण दराडे यांचा नियमबाहय कब्ज्याची नवीन माहिती सुद्धा समोर आली. विकास खारगे यांच्या बदलीनंतर दराडे यांचे पती प्रवीण दराडे जे मुख्यमंत्र्यांचे कार्यालयात सचिव आहेत त्यांस दिनांक 2 जानेवारी 2015 रोजी 4830 वर्ग फूटाचा बंगला देण्यात आला आहे.विकास खारगे नंतर हा बंगला डॉ संजय देशमुख यांस देण्यात आला होता पण त्यांनी बंगल्याऐवजी सरकारी सदनिकेत राहण्याचा मार्ग निवडला. जल अभियंताचा बंगला नेहमीच पालिकेतील सनदी अधिका-यांस देत चुकीचा पायंडा घातला गेला असता. 

मुख्यमंत्र्याच्या सचिवानी केलेला अनोखा कब्जा नियमबाहय एवढ्याचसाठी आहे कारण राज्य शासनातील सनदी अधिका-यांसाठी सदनिका देण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीत येते, असे सांगत अनिल गलगली यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांस प्रकरणाची चौकशी करत सदर बंगले जल अभियंता यांस देण्याची मागणी केली कारण ज्यांच्यासाठी या बंगल्याची सोय करण्यात आली होती कारण मलबार हिल जलाशय या संवेदनशील स्थानी जल अभियंता सारख्या महत्वाच्या अधिका-यांचा निवास आपातकालीन परिस्थितीत अत्यावश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad