मुंबई दि. २८ (प्रतिनिधी) – सहाय्यक निबंधक आणि विभागीय सहाय्यक निबंधक यांच्याकडून सहकार सोसायटींबाबत स्थगिती आदेश देण्यात येतात या नोटीस मध्ये स्थगितीची कारणेही देण्यात यावीत आणि ही प्रक्रिया पारदर्शी करावी अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली.
मुंबई एअरपोर्ट एम्प्लॉइज कॉ.ऑप. क्रेडीट सोसायटी च्या निवडणुकीबाबत भाजपा आमदार सुधाकर देशमुख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या विषयावर उपप्रश्न विचारताना आमदार आशिष शेलार यांनी राज्यात अशा सोसायट्यांचे वाद सहय्यक निबंधक किंवा विभागीय सह निबंधकांकडे जातात आणि त्यावर स्थगिती आदेश दिले जातात या स्थगिती आदेशामध्ये स्थगितीची कारणे देण्यात येत नाहीत. ती शोधण्यासाठी सोसायट्यांच्या सदस्यांना हेलपाटे मारावे लागतात म्हणून यापुढे स्थगिती आदेशावर कारणे देण्यात यावीत तसेच ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावी अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. तर वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील एच पूर्व आणि एच पश्चिम या महापालिका विभागातील निबंधकांची कार्यालये एमटीएनएल च्या वास्तूमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, ते कधी करणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्याल उत्तर देताना सहकार मंत्री सुभाष देखमुख यांनी ती प्रक्रिया अधिक पारदर्शी करण्यात येईल असे सांगत वांद्रे येथील कार्यालय लवकरच स्थलांतरीत होईल असे सांगितले.
No comments:
Post a Comment