मुंबई, दि. 20 : ऐरोली सेक्टर 9 ई येथील क्रमांक 7 च्या भूखंडाबाबत बनावट कागदपत्रे तयार करून नवी मुंबई महानगरपालिकेकडून बांधकाम परवाना घेण्यात आले आहे. हे निदर्शनास आल्यानंतर त्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन विकासकावर कार्यवाही करण्यात आली आहे असे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितले.
नवी मुंबईतील भूमाफियांनी सिडकोचे कोट्यवधी रूपयांचे भूखंड बळकाविल्याबाबत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे सदस्य सर्वश्री राहूल नार्वेकर, जयंत पाटील, संदीप बाजोरिया, भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले की, महामंडळ आणि त्रिपक्षीय कराराची बनावट कागदपत्रे तयार करुन बांधकाम परवाना घेण्यात आला होता. तो परवाना रद्द करुन मे. शुभ होम डेव्हलपर्सचे मालक व संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच सिडकोच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणीची पडताळणी न करता परवानगी दिली. त्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे, असे सांगून पाटील यांनी सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही सांगितले.
No comments:
Post a Comment