मुंबई - १२ जुलै - झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील अतिसामान्य नागरिक मुंबईच्या दैनंदिन सेवेत आपले मोलाचे योगदान देत असतात हे नागरिक मुंबई अथवा उपनगरातील घरे घेऊ शकत नाहीत, ही वस्तुस्तिथी लक्षात घेऊन मानवतावादी दृष्टिकोनातून १४ फुटांपेक्षा अधिक उंच असलेल्या झोपड्यांवर कारवाई न करता झोपडपट्ट्यांची उंची १९ फुटांपर्यंत वाढविण्यास कायदेशीर परवानगी देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली आहे.
भाजपच्या इशाऱ्यावरून पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी २ जुलै २०१६रोजी मुंबईतील १४ फुटापेक्षा उंची असलेल्या झोपड्यांची यादी करून या सर्व झोपड्यांवर पावसाळ्यानंतर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे. मुंबई महापालिकेवर गेली २० वर्ष शिवसेना भा ज पाची सत्ता आहे. मुंबई मध्ये कुठेही अनधिकृत बांधकाम होणार नाही याची दक्षता सत्ताधारी पक्ष व प्रशासनाने घेणे आवश्यक होते. परंतु युतीच्या कालावधीतच मुंबईत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत . झोपड्यांवर पोटमाळे तयार करीत असताना प्रशासनाने ही बांधकामे वेळीच कारवाई करून का थांबविली नाहीत , त्यावेळी प्रशासनाचे हात कोणी बांधले होते. असा सवाल प्रवीण छेद्दा यांनी केला आहे . आगामी मुंबई निवडणूक लक्षात घेऊन मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील शिवसेना आणि काँग्रेस ची व्होटबँक तोडण्यासाठीच महानगरपालिका आयुक्तांच्या मदतीने १४ फुटांवरील झोपड्यांवर कारवाई भारतीय जनता पक्षाचा डाव आहे , असा आरोप प्रवीण छेडा यांनी केला आहे. .
मुंबईत रोजंदारीवरील कामे करून ,अथवा छोटि मोठी कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे , मुंबईत घर घेणे परवडत नसल्याने नाईलाजाने झोपडपतंट्यांमध्ये राहत आहेत. यांची वाढती कुटुंबाची गरज लक्षात घेता , यांना १९ फुटांपर्यंत झोपड्यांची उंची करण्यासाठी कायदेशीर परवानगी देण्यात यावी अशी मागणीही प्रवीण छेडा यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment