मुंबई, दि. 25 : स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ परराज्यात नेणाऱ्यांविरुध्द जीवनावश्यक वस्तु कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी आज विधानसभेत सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ परराज्यात नेणारे दोन ट्रक पकडल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य किशोर पाटील,शशिकांत शिंदे, प्रशांत बंब, रणजीत कांबळे, अब्दुल सत्तार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना बापट यांनी सांगितले की, चाळीसगांव पोलिसांनी24 मे 2016 रोजी 649 पोती तांदूळ घेऊन जाणारे दोन ट्रक संशयास्पद म्हणून ताब्यात घेतले आहेत. हे ट्रक शेख इफ्तेखार अब्दुल रऊफ यांच्या मालकीचा असून त्यांच्या गोडाऊन मधून मौजे किम व मौजे साणंद येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याबाबत दोन्ही ट्रक चालकांनी पोलिसांना जबाबात सांगितले आहे. सदर प्रकरण जीवनावश्यक वस्तु कायदा, 1955 च्या अंतर्गत नोंदविण्यात आले आहे. शेख यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे क्रिमीनल रिट पिटीशन दाखल केले असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
No comments:
Post a Comment