मुंबई / प्रतिनिधी - आंबेडकरी चळवळीचे केंद्र बिंदू असलेले आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ १९ जुलै रोजी मोर्चाला विविध संघटना आणि पक्षाचा पाठिंबा मिळत असून या मोर्चा मध्ये एमआयएम पक्षही सामील होणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकशाही आघाडीतील भारिप बहुजन महासंघाचे जनरल सेक्रेटरी ज.वि. पवार यांनी दिली आहे.
१९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील राणीबाग येथून विधान भवनावर मोर्चा काढला जात आहे. या मोर्चात भारिप बहुजन महासंघ, सीपीआय, श्रमिक मुक्ती दल, लाल निशान, रिपब्लिकन सेना, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, शिवशक्ती - भीमशक्ती, भारतीय बहुजन रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन प्यान्थर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) आदी पक्ष संघटना सामील होणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर करणार असून या मोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ज.वि. पवार यांनी केले आहे.
दरम्यान १९ जुलैच्या मोर्चात आरपीआय (खरात) गटाचे हजारो कार्यकर्ते सामील होणार असल्याची माहिती अध्यक्ष सचिन खरात यांनी दिली आहे. तसेच राष्ट्रीय बहुजन महासंघाचे संघटना प्रमुख प्रशांत सदामते यांनीही आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह सहभागी होणार असल्याचे कळविले आहे.
No comments:
Post a Comment