एकूण ६५ पिशव्या रक्त संकलीत
मुंबई / प्रतिनिधी
‘सी’ विभाग कामगार – कर्मचारी तक्रार निवारण समितीतर्फे मंगळवार, दिनांक १२ जुलै, २०१६ रोजी ‘सी’ विभाग कार्यालय, तळमजला कंपाऊंड येथे रक्तदान शिबीर पार पडले.
सदर शिबिरामध्ये कामगार - कर्मचारी – अधिकारी यांनी सहभाग घेतला. या शिबिरात एकूण ६५ पिशव्या रक्त संकलीत करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय रक्तपेढीकडे या पिशव्या सुपूर्द करण्यात आल्या.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘सी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त जीवक संतोष घेगडमल, नगरसेवक संपत ठाकुर, सहाय्यक अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) एस. के. मुढे, सहाय्यक अभियंता (जलकामे) सागर, तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष बळीराम पाटील, सरचिटणीस राजु शिर्के, शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, ‘सी’ विभागातील विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी आणि प्रभाग समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment