उत्तरप्रदेश / मैनपुरी, दि. २८ - पंधरा रुपयांची उधारी चुकवली नाही म्हणून एका व्यक्तीने कुहा-डीचे घाव घालून दलित दांम्पत्याची हत्या केली. उत्तरप्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. मृत दांम्पत्याने आरोपीच्या दुकानातून पंधरा रुपयांचे सामान उधार घेतले होते. ही उधारी चुकवली नाही म्हणून दलित दांम्पत्याची हत्या केली.
लखीमपूर गावात रहाणा-या भारत सिंहने गावातील दुकानदार अशोककडून १५ रुपयाचे सामान उधारीवर घेतले होते. गुरुवारी सकाळी भारत सिंह पत्नी ममता सोबत शेतावर चालला असताना अशोक त्याला भेटला. त्याने भारतचा रस्ता अडवून पंधरा रुपये मागितले. भारतने त्याला संध्याकाळी पैसे देतो असे सांगितले. पण अशोक ऐकायला तयार नव्हता. दोघांमधले भांडण मारामारीपर्यंत पोहोचले. अशोकने हातातल्या कु-हाडीने ममता आणि भरतच्या गळयावर वार केले. दोघेही रक्ताच्या थारोळयात खाली कोसळले. काहीवेळातच त्यांचा मृत्यू झाला. हत्या करुन तिथून पळणा-या अशोकला आसपासच्या लोकांनी पकडले. त्यानंतर पोलिस आले व त्यांनी अशोकला अटक केली.
No comments:
Post a Comment