मुंबई / प्रतिनिधी - बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्या बद्दल भाजपाच्या उपाध्यक्षाने वापरलेल्या अपशब्दामुले बसपा कार्यकर्ते संतप्त झाले आहे. संतप्त अश्या कार्यकर्त्यानी गुरुवारी आझाद मैदाना समोर रास्ता रोको केला.
मायावती यांच्या बाबत भाजपाचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी अपशब्द वापरले होते. यामुले संतापलेल्या बसपा कार्यकर्त्यानी आझाद मैदानात निदर्शने केली. निदर्शने करणाऱ्या काही महिला कार्यकर्त्या आझाद मैदाना समोरील रस्त्यावर उतरल्या आणि रास्तारोको केला. पोलीसानी आंदोलकांची समजुत घालत आझाद मैदानात नेले. आझाद मैदानात बसपाच्या कार्यकर्त्यानी प्रधानमंत्री मोदी आणि भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपा उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांचे फोटो असलेले ब्यानर व भाजपाचा झेंडा आंदोलनकर्त्यानी जाळला. दयाशंकर सिंह यांच्या विरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती बसपाचे महाराष्ट्र अध्यक्ष विजय गरुड़ यांनी पत्रकाराना दिली.
No comments:
Post a Comment