राज्य, जिल्हा, तालुका ग्रामपातळीवर दारुबंदी समित्या गठित होणार - चंद्रशेखर बावनकुळे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2016

राज्य, जिल्हा, तालुका ग्रामपातळीवर दारुबंदी समित्या गठित होणार - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई / नागपूर, 28 जुलै 2016
राज्य, जिल्हा, तालुका व गावपातळीवर दारुबंदी समित्यांचे गठन करण्याचे आश्वासन सरकारतर्फे वि‍धिमंडळाच्या सभागृहात केले. या संदर्भातील निवेदनानंतर चंद्रशेखर बावनकुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटले व त्यांना दारुबंदी समित्या व अन्य तीन विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. 
याप्रसंगी उत्पादन शुल्क मंत्र्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी बराच वेळपर्यंत चर्चा केली. दारुबंदीसाठी निवडणूक होत असताना ती चिन्हासह व्हावी. राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवर दारुबंदी समित्यांचे गठन करण्यात यावे. गावातील अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळण्याच्या दृष्टीने ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करुन नागरिकांना सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. राज्य उत्पादन शुल्काद्वारे मिळणाऱ्या महसूलातून काही टक्के निधी हा लोक प्रबोधनावर खर्च करण्यात यावा, अशी सूचना अण्णा हजारे यांनी उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांना केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad