मुंबई दि. २८ (प्रतिनिधी) – राज्यात कलम ३९४ नुसार दुकानांना परवानग्या दिल्या जातात मात्र आता केंद्र सरकारचा नाईट मार्केट बाबतचा कायदा येत असून या कायद्या अंतर्गत निवासी विभागात नाईट मार्केट ला परवानगी मिळणार काय ? तशी परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना केंद्राचा कायदा बंधकारक नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विधानसभेत आज अंधेरी जुहूगल्ली येथील औषधाच्या दुकानाला लागलेल्या आगीबाबतची लक्षवेधी सूचना दोन्हीकडच्या सदस्यांनी उपस्थित केली होती. याचर्चेतसहभागी होताना आमदार आशिष शेलार यांनी अंधेरीतील या दुकानाला कलम ३९४ नुसार परवानगी घेण्यात आलेली नव्हती तसेच फायर ऑडीट करण्यात आले नव्हते त्यामुळे या प्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणी दोषी असणाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर जे अधिकारी दोषी आहेत त्यांचावर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्याय दंडाधिकारी मार्फत पुढील कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी परिस्थिती असली तरी या प्रकरणी तो दाखल करता येणार नाही. मात्र अशा घटना भविष्यात घडल्यास सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच राज्यात कमल ३९४ नुसार दुकान व हॉटेल यान परवाने दिले जातात आता केंद्र सरकारचा नाईट मार्केट बाबतचा नवा कायदा येतो आहे हा कायदा राज्याला बंधनकारक असेल का ? नव्या कायद्या नुसार निवासी क्षेत्रात नाईट मार्केटला परवनगी देण्यात येणार का ? अशा प्रकारची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी करीत राज्याचा कायदा अधिक सक्षम करण्यात यावा, अशी मागणी आमदार शेलार यांनी केली. त्याबाबत स्पष्टता देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्राचा कायदा राज्याला बंधनकारक नसेल.
No comments:
Post a Comment