‘आंबेडकर भवन’ प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2016

‘आंबेडकर भवन’ प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 20 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादर येथे उभारलेले आंबेडकर भवन आणि ऐतिहासिक बुध्दभूषण प्रिंटीग प्रेस 25 जुलै, 2016 रोजी पहाटे अचानकपणे पाडण्यात आले. या प्रकरणी दोषींवर तत्काळ गुन्हे नोंदविले आहेत. पाडकाम करण्याचे आदेश देणारे रत्नाकर गायकवाड हे राज्याच्या माहिती आयुक्त या संवैधानिक पदावर असल्यामुळे त्यांच्यावरील आरोपांची माहिती राज्यपाल महोदयांकडे पाठवून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. तसेच बुध्दभूषण प्रिंटींग प्रेसचे पुनर्निर्माण करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र विधान परिषद नियम 101 अन्वये दादर येथील आंबेडकर भवन पाडण्यात आल्या संदर्भात सदस्य निलम गोऱ्हे, प्रकाश गजभिये, जयंत पाटील, भाई जगताप, अनिल भोसले, नरेंद्र पाटील, ॲड जयदेव गायकवाड, संदिप बाजोरिया आदींसह इतर सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आंबेडकर भवन (तळमजला+1) या आर.सी.सी. इमारतीला पाडण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 354 नुसार नोटीस बजावण्यात आली असताना बुध्दभूषण प्रिंटींग प्रेसचा नोटीसमध्ये समावेश नसतानाही ती पाडण्यात आली. त्यामुळे कलम 354 ची नोटीस योग्य पध्दतीने देण्यात आली की नाही हे तपासले जाईल. त्याचबरोबर द पिपल इम्रुपव्हमेंट ट्रस्ट  आणि आंबेडकर कुटुंब यामध्ये वाद वाढू नये यासाठी  शासन मध्यस्ती करण्यास तयार आहे. बुध्दभूषण प्रिंटींग प्रेसचे बांधकाम ही शासन करणार तसेच बुध्दभूषण प्रिंटींग प्रेस हेरिटेज वास्तूमध्ये समाविष्ट करण्याबाबत महानगरपालिकेला सूचना दिली जाईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad