मुंबई / प्रतिनिधी 29 July 2016
बेस्ट उपक्रमातील आपल्या विविध मागण्यासाठी सामुदायिक रजा आंदोलन करणार्या अभियंत्यांवर कारवाई करण्याचे संकेत महाव्यवस्थापक जगदीश पाटिल यांनी दिले आहेत. बेस्ट समितीमधे अभियंत्यांचे आंदोलन होत असताना समिती सदस्यांना कोणतीही माहिती दिली नसल्याने कोंग्रेसचे सदस्य रवी राजा यांनी मांडलेल्या सभा तहकुबीला उत्तर देताना पाटिल बोलत होते.
बेस्टमधील अभियंते ब वर्गात असल्याने त्यांनी 5 दिवसाचा आठवडा करण्याची मागणी केली आहे. ही मागणी 1983 पासूनची असली तरी 2005 पासून पुढे आली.2011 मधे असा प्रस्ताव बेस्ट समिती समोर आला असता तो प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. 21 एप्रिलला याबाबत एक समिती नेमण्यात आली. या समितीचा अहवाल कालच प्राप्त झाला असून त्यावर चर्चा करण्यात येईल. बेस्टही विज पुरवठा करणारी कंपनी असल्याने 24 तास सेवा द्यायची झाल्यास 2 कामगार संघटनानीही याला विरोध दर्शवला असल्याचे पाटिल यांनी सांगितले.
अभियंत्यांच्या मागण्या किचकट आहेत. 23 जुलैला सामुदायिक रजा आंदोलन केले जाणार असल्याने 21 जुलैलाच परिपत्रक काढून रजा देवू नए असे आदेश दिले तरीही 911 पैकी 792 अभियंते या आंदोलनात सहभागी झाल्याने शिस्त म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे पाटिल यांनी सांगितले. रवि राजा यांनी अभियंते रजेवर असल्यास विजेच्या तक्रारीवर कारवाई कशी होणार असा प्रश्न उपस्थित करत या आंदोलनात अ दर्जाचे अधिकारीही सामिल असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली. संदेश कोंडविलकर यांनी 23 तारखेला 593 पैकी फ़क्त 5 तक्रारीवर कारवाई करण्यात आली. अभीयंत्यांवर कारवाई न करता समज किंवा मेमो देण्यात यावे असे सांगितले.
मनसेचे केदार होम्बालकर यांनी प्रकरण जास्त न तानता मुंबईकर ग्राहकांकडे बघावे. बेस्ट तोट्यात असताना आणि टाटा सारख्या कंपनीचे आवाहन असताना प्रशासनाने लक्ष घालावे. अभीयंत्यांनीही नागरिकांना वेठीस धरु नए असे सांगितले. शिवसेनेचे सुनील गणाचार्य यांनी प्रशासन आणि तांत्रिक विभागात तालमेल नसल्याने बेस्ट समिती अध्यक्षांनी लक्ष घालून संयुक्त मीटिंग लावावी अशी मागणी केली. यावर अध्यक्ष मोहन मीठबावकर यांनी समितीचा अहवाल आला असल्याने यावर चर्चा करण्याचे व अभीयंत्यांबरोबर वाटाघाटी सुरु ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. रवि राजा यांनाही सभातहकुबी मागे घेण्याची विनंती अध्यक्षांनी केली यावर रवी राजा यांनी सभातहकुबी मागे घेतली.
No comments:
Post a Comment