मुंबई, 18 : राज्य शासनाच्या दोन कोटी वृक्षलागवडीच्या यशस्वीतेचे साक्षीदार असलेल्या जुलै महिन्याचे 'महाराष्ट्र अहेड' या इंग्रजी मासिकाचे सर्वत्र स्वागत होत आहे.माहितीने परिपूर्ण असा हा अंक बाजारात उपलब्ध आहे.
पर्यावरणाविषयी जागरुकता दाखवून पर्यावरण संरक्षण आणि संर्वधनासाठी दोन कोटी झाडे लावण्याचा निर्धार राज्याच्या वन विभागाने केला होता. त्यादृष्टीने मोठ्या प्रमाणावर जनजागृतील झाली. या मोहीमेला लोकचळवळीचे रूप प्राप्त झाले आणि मोहीम यशस्वी झाली. याचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जल, जमीन आणि जंगलाचे संवर्धन यासंबंधीचा लेख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शेती व त्यातील बदलावर मुख्यमंत्र्यांनी केलेले चिंतन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत आणि वाघांचे जगभरातील विविध प्रकार हे या अंकाचे आकर्षण आहे.
महाराष्ट्रातील एक हजार पाचशे वर्षे जुन्या लेण्यांचा इतिहास आणि ओळख या अंकात करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रतील सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होणाऱ्या हळदीच्या उत्पादनाची उकृष्ट छायाचित्रांसोबत माहिती अंकात आहे. त्याचबरोबर कोळी बांधवासाठी महत्वपुर्ण असलेल्या नारळी पौर्णिमेचे महत्व यावर आधारीत लेख, वृक्षारोपण व संर्वधनातून पाणी, माती आणि वनांचे संरक्षण याविषयी माहिती दिलेली आहे. मासिकाच्या उत्तरार्धात छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तुचे वर्णन मुंबईतील महत्व व पार्श्वभूमी उपयुक्त माहिती छायाचित्रांसह दिलेली आहे.
No comments:
Post a Comment