पाउस कमी होताच मुंबईतील उखडलेले जंक्शनची दुरुस्ती करण्याचे आयुक्तांचे आदेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2016

पाउस कमी होताच मुंबईतील उखडलेले जंक्शनची दुरुस्ती करण्याचे आयुक्तांचे आदेश

मुंबई  / प्रतिनिधी 4 July 2016 - मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील जंक्शन उखडली आहेत. उखडलेल्या जंक्शनमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. नागरिकांनाही या दिव्यसंकटातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अशा जंक्शनची तात्काळ दुरुस्ती करा, असे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले.

मागील दोन आठवडा भरापासून मुंबईत पावसाची तुफान बॅटींग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते व जंक्शन उखडली आहेत. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्यास त्याठिकाणहून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. यावर उपाय म्हणून जंक्शनची दुरुस्ती करावी, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. सोमवारी पावसाने उंसत घेतल्याने दुरुस्ती कामे हाती घ्याव्यात अशा सूचना विभाग कार्यालयांना दिल्या आहेत. शहरातील नाना चौक, ताडदेव चौक, हाजी अली जंक्शन व हिंदमाता जंक्शन, पूर्व उपनगरातील घाटकोपर लिंक रोड, लालबहादूर शास्त्री रोड, गांधी नगर जंक्शन तर पश्चिम उपनगरातील अंधेरी लिंक रोड, एस. व्ही. रोड, ना. सी फडके रोड, जुहू येथील महावीर जंक्शन, लोखंडवाला कॉम्प्लेक्स जंक्शन, एमआयडीसी सेंट्रल रोड जंक्शन आणि जे.व्ही.एल. आर रोड जंक्शन दुरुस्तीच्या रडारवर आहेत. जंक्शनच्या दुरुस्तीसाठी कोणतीही विशेष तरतूद केलेली नाही. रस्ते बांधकाम केलेल्या कंत्राटादाराकडून ही दुरुस्ती करून घेतली जाईल, अशी माहिती पालिका उपायुक्त सुधीर नाईक यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad