मुंबई, दि. 25 : सौदर्यप्रसाधनांच्या माध्यमातून कोणालही कर्करोग होऊ नये यासाठी खबरादारी म्हणूनच ‘जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी’च्या बेबी पावडर प्रॉडक्टची चाचणी करण्यात आल्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत सांगितले.
राज्यात विक्री होत असलेल्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडर प्रोडक्टची चाचणी करण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य अमिन पटेल, सरदार तारासिंह यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना बापट यांनी सांगितले की, मार्च 2016 च्या पहिल्या आठवडयात वेगवेगळया कंपन्यांच्या टाल्कम पावडरचे 14 नमुने मुंबई व ठाणे परिसरातून चाचणी व विश्लेषणासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आले होते. यानंतर सर्व नमुने चाचणी व विश्लेषणार्थ मुंबईच्या औषध नियंत्रण प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले असून 14 नमुन्यांपैकी 11 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. सदर कंपनीने उत्पादित केलेल्या बेबी पावडरचा नमुना चाचणीअंती प्रमाणित असल्याने याबाबत पुढील कारवाई करण्यात आलेली नाही.
No comments:
Post a Comment